चिकलठाणा व्यापारी संकुलाच्या कामातील अडथळा दूर  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Commercial Complex : चिकलठाणा व्यापारी संकुलाच्या कामातील अडथळा दूर

भूमिअभिलेखकडून जागेची मोजणी पूर्ण : नकाशा उपलब्ध होताच बांधकाम

पुढारी वृत्तसेवा

Obstacles in the work of Chikalthana Commercial Complex removed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना रोडवर चिकलठाणा रस्ता रुंदीकरणा आड येणाऱ्या व्यावसायिक मालमत्तांवर जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. यामुळे अनेक व्यापाऱ्यांवर बेर-ोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून या व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी प्रशासक जी. श्रीकांत यांनी परिसरातील शासकीय जमिनीवर व्यापार संकुल बांधण्याचा निर्णय घेतला. परंतु, जागेची मोजणीच झाली नसल्याने हे काम थांबले होते. अखेर भूमिअभिलेख विभागाने मोजणीचे काम पूर्ण केल्याने आता बांधकामातील अडथळा दूर झाला आहे. नकाशा उपलब्ध होताच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहराच्या मुख्य प्रवेश-द्वारांचा कोंडलेला श्वास महापालिकेच्या रुंदीकरण मोहिमेमुळे मोकळा झाला आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत महापालिकेचे पाच प्रमुख प्रवेशद्वारांवर ही मोहीम राबविली. त्यात जालना रोडचाही समावेश असून या रस्त्यावर केंब्रिज शाळा चौक ते एपीआय कॉर्नरदरम्यान ६० मीटर रुंदीआड येणाऱ्या शंभरहून अधिक दुकानदार बेर बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली. यात चिकलठाण्यातील सुमारे ोजगार झाले आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रशासक जी. श्रीकांत यांनी या परिसरातील सव्वा एकर शासकीय जागेत व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

संकुलाची निविदा अंतिम टप्प्यात

या दोन मजली व्यापारी संकुलात अनेकांना दुकाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याशिवाय रुंदीकरणाआड येणारे महापुरुषांचे पुतळे देखील याच जागेत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. या व्यापार संकुलाची निविदा अंतिम करण्यात आली असून जागेची मोजणी न झाल्याने काम थांबले होते. मात्र, या मोजणीसाठी महापालिकेने भूमिअभिलेख विभागाकडे ४६ हजार रुपये शुल्क भरणा केल्यानंतर शनिवारी जमिनीची मोजणी केली. लवकरच या जा-गेचा नकाशा उपलब्ध होणार असून त्यानंतर व्यापारी संकुलाची जागा निश्चित होणार आहे. या मोजणीवेळी उपायुक्त अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, नागरिक मित्र पथकाचे प्रमोद जाधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT