शेतातील गवत काढण्याच्या कारणातून भावाकडून भावाची हत्‍या  File Photo
छत्रपती संभाजीनगर

शेतातील गवत काढण्याच्या कारणातून भावाकडून भावाची हत्‍या

पुढारी वृत्तसेवा

पैठण : पुढारी वृत्तसेवा

शेतातील गवत उपटण्याच्या कारणावरून तोंडोळी येथील एका कुटुंबात जोरदार हाणामारीची घटना घडली. यामध्ये दोन भावांमध्ये झालेल्‍या भांडणात भावानेच भावाचा खून केल्याची घटना घडली. ही घटना (शनिवार) उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. खून झालेल्या व्यक्तीचे नाव नसरुद्दीन करीमोद्दीन शेख (वय ५५ वर्ष) रा. तोंडोळी ता. पैठण असे आहे. या प्रकरणी संशयित आरोपी भावाविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोंडोळी गावालगत शेख असलम शेख नसरुद्दीन यांच्या कुटुंबाची सामायिक शेती गट क्रमांक १०३ आहे. या शेतातील जनावरांना खावयाचे गवत उपटण्याच्या कारणावरुन या कुटुंबामध्ये लाठ्या काठ्याने मारहाण झाल्याची घटना घडली. यामध्ये आरोपी शेख मोईन शेख करीमोद्दीन यांनी कुटुंबातील इतर व्यक्ततींना मारहाण करून नसिरुद्दीन करीमोद्दीन शेख या सख्ख्या भावाला जबरी मारहाण केली. यामध्ये खून झाल्याची तक्रार शेख असलम शेख नसिरुद्दीन रा. तोंडोळी यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात दाखल केल्यामुळे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT