Minor Girl Kidnapping : अल्पवयीन मुलीचे अपहरण : दोघांना अटक; एकजण फरार  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Minor Girl Kidnapping : अल्पवयीन मुलीचे अपहरण : दोघांना अटक; एकजण फरार

एका अल्पवयीन मुलीला कानशिलात लगावत जबरदस्तीने सेव्हन हिल परिसरातील ओयो हॉटेलात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

Kidnapping of minor girl: Two arrested; one absconding

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एका अल्पवयीन मुलीला कानशिलात लगावत जबरदस्तीने सेव्हन हिल परिसरातील ओयो हॉटेलात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० ते १०.१५ च्या दरम्यान घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी लॉज चालक सतेंद्र रावत व वेटर सोनू चव्हाण यांना अटक केली आहे. अपहरणकर्ता यश दिवेकर (२१ रा. मुकुंदवाडी) मात्र पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

१७ वर्षीय पीडिता व यश दिवेकर हे एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पीडिता ही तिच्या मावस बहिणीसोबत डी-मार्ट परिसरातून पायी जात असताना यश दिवेकर हा आपल्या मित्रासह दुचाकीवर आला. त्याने पीडितेला जबरदस्तीने रिक्षात बसवत जिवे मारण्याची धमकी देत गजानन मंदिरापर्यंत आणले. तेथून त्याने तिला पायी सेव्हन हिल परिसरातील ओयो लॉजवर नेत तेथे एका रूमध्ये डांबून ठेवले.

नातेवाईकांची लॉजवर धाव

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आई व मावशीने नातेवाईकांसह ओयो हॉटेलवर धाव घेतली. पीडितेची सुटका केली. या गोंधळात यश दिवेकर पसार झाला. यानंतर पीडितेने नातेवाईकांसह थेट पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठले. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून तपासादरम्यान गुन्ह्यात ओयो हॉटेल लॉज चालक व वेटर या दोघांचा देखील समावेश असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. त्या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विनोद भालेराव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT