Heavy rains in the city cause a loss of Rs 409 crores
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरात आठवडाभरापूर्वी सलग दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन नाले वाहून गेले. तर एक ठिकाणी रस्ता खचला आहे. याशिवाय रस्त्यांसह महापालिकेच्या इमारतींचीही पडझड झाली असून, सुमारे ४०९ कोटी रुपयांचे नुकसान आहे. त्यामुळे हा सुधारित अहवाल तातडीने राज्य शासनाला सादर करा, असे आदेश सोमवारी (दि.६) महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी आढावा बैठकीत संबंधित विभाग प्रमुखांना दिला.
शहरात सप्टेंबर महिन्यात सलग चार ते पाच वेळा अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव तयार करून महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यात रस्त्यांचे ६५ कोटी रुपये नुकसान झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. पंरतु या नुकसानीनंतर लागलीच दुसऱ्या आठवड्यात शहरात पुन्हा दमदार अतिवृष्टी झाली.
सलग दोन दिवस हा पाऊस शहरात तळ ठोकून होता. त्यामुळे सातारा, देवळाई, राहुलनगर, सादातनगर, नारेगाव, किराडपुरा, कटकटगेट, भावसिंगपुरासह इतर विविध भागांतील रस्ते, पूल वाहून जाण्याची आणि रस्ते, पुलांसह नाले घडल्या. तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरांसह महापालिकेच्या इमारतींची किरकोळ स्वरूपात पडझड झाली. त्यामुळे अतिवृष्टीत झालेल्या या संपूर्ण नुकसानीचा एक प्रस्ताव तयार करण्याचे आदेश शहर अभियंता फारुख खान यांना सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. खचण्याच्या घटना दरम्यान प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४०९ कोटी रुपयांचे हे नुकसान झाले आहेत. त्याहून अधिक असू शकते, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.
प्रस्ताव तयार करणे सुरू राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महापालिकेने अगोदर ६५ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्रस्ताव दिला होता. पंरतु त्यानंतर पुन्हा नुकसान झाले असून सुधारित नुकसानीचा प्रस्ताव तयार करणे सुरू आहे.-फारुख खान, शहर अभियंता, मनपा
अतिवृष्टीमुळे सातारा-देवळाईतील दोन पूल आणि भावसिंगपुरा येथील स्मशानभूमीजवळील एक असे तीन पूल वाहून गेले. त्यासोबतच राहुलनगर, कटकटगेट, रोशनगेट येथील नाले, विविध भागांतील रस्त्यांच्या नुकसानीचा यात समावेश आहे.