Eicher vehicle crushes couple on moped
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : एका आयशर वाहनाने मोपेडवरील पती पत्नीस चिरडल्याची घटना सोमवारी (दि. २७) दुपारी अहिल्यानगर महामार्गावरील एएसक्लब चौकाजवळ घडली. संजय पंडित राऊत (३८) व अनिता राऊत (रा. भानसगाव, जि. उस्मानाबाद ह. मु. साठेनगर, वाळूज ) अशी अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीचे नावे आहेत.
संजय राऊत व त्यांची पत्नी अनिता हे सोमवारी दुपारी विना क्रमांकाच्या नवीन मोपेडवरून पंढरपूरकडून एएस क्लब चौकात होते. सिडको वाळूज महानगर येथील कमानीपासून ते थोडे पुढे जात नाही तोच दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या एका आयशर वाहनाने त्यांच्या मोपेडल जोराची धडक दिली.
या अपघात दोघे पती-पत्नी मोपेडवरून खाली पडल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शंकर शिरसाट आदींनी जखमींना १०८ रुगवाहिकेतून उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी संजय पंडित व अनिता यांना तपासून मयत घोषित केले.