मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  File Photo
छत्रपती संभाजीनगर

गृहमंत्री शहांशी चर्चा सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा सकारात्मक झाली. सुरुवाती पासूनच चर्चा सकारात्मक सुरू आहे. लवकरच निर्णय होईल, जे होईल ते समन्वयाने होईल. तसा लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. चिकलठाणा विमानतळावर मंगळवारी (दि.24) रात्री उशिरा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तत्पूर्वी, मंगळवारी रात्री शहरातील रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यात तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा झाली.

दरम्यान मुख्यमंत्री शिंदे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर बोलताना पुढे म्हणाले, लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या, असे बोलणारे विरोधक आज आरोपीची बाजू घेत आहेत. जनता हे उघड्या डोळ्यांनी बघत असून मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार विरोधीपक्ष करत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. असे मुख्यमंत्री शिंदे विरोधकांवर टीका करताना म्हणाले.

विरोधकांची दुटप्पी भूमिका : शिंदे

लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांची झोप उडाली आहे. बदलापूर सारख्या संवेदनशील प्रकरणात आरोप करणाऱ्या विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेला जनता उत्तर देईल, त्यांची जागा दाखवील. ताबडतोब फाशी द्या, शासन करा म्हणणारे आता फक्त राजकारण करत आहेत. मात्र, महाराष्ट्राची जनता सुज्ञ असून ती बरोबर हिशोब करेल. अशी जोरदार टीका त्यांनी विरोधकांवर केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT