BJP workers should show their strength in the elections - MLA Bamb
लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून - निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागावे, आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले.
लासूरस्टेशन येथील पांडव लॉन्स - येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नवे जुने कार्यकर्ते जोडून नवीन नेतृत्व तयार करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपण आपली ताकद दाखवून द्यावी लागेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल.
कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे. गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षांपासून मतदारांनी माझ्यावर दाखव -लेला विश्वास सार्थ करून दाखवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद गाडून आपली ताकद दाखवून द्यावी. कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका लढवून जिंकाव्यात असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी लोकसभा, केले. मागील विधानसभा निवडणुकीसंदर्भात आत्मचिंतन आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा वाढवावी, यासाठी ऊहापोह झाला. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर धनायत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.