बीड : आष्टी तालुक्यातील बावी या गावातील राजू गोल्हार हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची घटना रविवारी (दि.९) घडली. गुरे चारण्यासाठी गेलेला परतला नसल्याने गावकऱ्यांनी शेध घेतला असता ही घटना समोर आली आहे.
राजू गोल्हार हा तरुण शनिवारी (दि.८) गुरे चारण्यासाठी गेला होता. परंतु सायंकाळी तो न परतल्याने गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह गावापासून जवळच असलेल्या डोंगराळ भागात आढळून आला. त्यामध्ये बिबट्याने त्याच्या शरीराचा काही भाग खाल्ल्याचे समोर आले.
काही दिवसांपूर्वी याच भागात बिबट्याने गाईवर देखील हल्ला केला होता. वनविभागाने वेळेत उपायोजना केली असती तर हा तरुण वाचला असता अशी प्रतिक्रिया सरपंच लटपटे यांनी व्यक्त केली. किमान आता तरी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बावी ग्रामस्थांनी केली आहे.