शेतकऱ्याने शेतीसाठी झाडावर चढून मागितला न्याय! Pudhari Photo
बीड

शेतकऱ्याने शेतीसाठी झाडावर चढून मागितला न्याय!

करण शिंदे

परळी वैजनाथ : परळी तहसील कार्यालय परिसरात असलेल्या एका शेवरीच्या झाडावर चढून शेतकऱ्याने प्रशासनाकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला आहे. तब्बल तीन तास हा शेतकरी झाडावर चढून होता. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीने त्याला खाली उतरविण्यात आले.

सुरेश उपाडे यांची परळी तालुक्यातील रेवली गावात शेतजमीन आहे. मात्र नातेवाईकांनी बोगस फेर ओढून त्यांची शेत जमीन बळकावली आहे. हे प्रकरण उपविभागीय कार्यालयात मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याने गुरुवारी (दि.27) या संतप्त झालेल्या शेतकऱ्याने झाडावर चढून न्याय मागितला. न्याय न मिळाल्यास झाडावरून उडी मारून जीवन संपवण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला होता. मात्र उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्या मध्यस्थीने प्रकरण मार्गी लावू अस आश्वासन सुरेश उपाडे यांना देण्यात आलं. आणि अखेर क्रेनच्या मदतीने त्यांना खाली उतरविण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT