Beed News : प्रतीक्षा संपली; माजलगावात महिला राज!  File Photo
बीड

Beed News : प्रतीक्षा संपली; माजलगावात महिला राज!

नगराध्यक्ष पद ओबीसी महिलांसाठी; मात्तब्बर लागले कामाला

पुढारी वृत्तसेवा

Reservation for the post of Majalgaon Mayor announced

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : चार वर्षांची दीर्घ प्रतीक्षा, राजकीय उत्सुकतेचा धगधगता प्रश्न आणि नगरपरिषदेवर चाललेले प्रशासकीय राज्य या सर्वांवर आज पडदा पडला आहे. अखेर माजलगाव नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून, या पदासाठी इतर मागासवर्गीय (जइउ) महिला प्रवर्ग निश्चित करण्यात आला आहे.

या निर्णयाने शहरात अक्षरशः महिलाराज अवतरले असून, नगर राजकारणात नव्या समीकरणांची कुजबुज सुरू झाली आहे. अनेक मातब्बरांचे स्वप्न या घोषणांसह भंगले असून, पक्षांच्या गोटात नवी रणरचना सुरू झाली आहे. ओबीसी आर क्षणाच्या गुंत्यात अडकलेली नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया तब्बल चार वर्षांपासून रखडलेली होती.

या काळात नगरपरिषदेवर प्रशासक नेमण्यात आले, तर कार्यकर्त्यांच्या मनात निराशेचे वातावरण पसरले होते. निवडणूक कधी? हा प्रश्न प्रत्येक गल्लीबोळात ऐकू येत होता. आजच्या आरक्षण सोडतीनंतर अखेर हा प्रश्न संपुष्टात आला असून, राजकीय वातावरण पुन्हा पेट घेत आहे. नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला प्रवर्ग ठरल्याने आता अनेक पक्षांचे गणिते बदलणार आहेत. यानिमित्ताने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून, जुन्या नेत्यांची राजसत्ता महिलांच्या हातात आता जाणार आहे.

शहरात अनेक सक्षम, कार्यक्षम व लोकप्रिय महिला पुढे येण्यास उत्सुक आहेत. काही या स्वतःच्या कार्यक्षमतेच्या जोरावर तर काही आपल्या पती, दिर किंवा पुत्रांच्या राजकीय पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी सज्ज आहेत. नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून मा. नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या आई शेख यासीन बी, मा. सभापती यांच्या सौभाग्यवती मनीषा नितीन नाईकनवरे, माजी उपनगराध्यक्ष रेश्मा दीपक मेंडके, माजी उपनगराध्यक्ष राधाताई तुकाराम येवले, माजी नगराध्यक्ष डॉ. अशोक तिडके यांच्या आई मीराबाई तिडके, माजी नगरसेवक सय्यद राज अहमद यांच्या पत्नी रुबीनाबी सय्यद, माजी नगराध्यक्ष सुमन माणिकराव मुंडे, मा. नगरसेवक शरद यादव यांच्या पत्नी अश्विनी यादव, मा. नगरसेवक राहुललंगडे यांच्या सौ. मनीषा लंगडे, मा. नगरसेवक विजय शिंदे यांच्या पत्नी सुजाता शिंदे, रफिक तांबोळी यांच्या पत्नी यास्मिन तांबोळी हि नवे चर्चेत आहेत.

माजलगावच्या नगरर- ाजकारणात ही आरक्षण सोडत म्हणजे नव्या पर्वाची सुरुवात आहे. चार वर्षांची प्रतीक्षा संपली असली तरी आता खरी चुरस सुरू होणार आहे. राजकारणात स्त्री शक्तीचा प्रभाव कसा उमटतो, हे पाहण्यासाठी माजलगावच्या जनतेची नजर येत्या निवडणुकीकडे लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT