नगर-सोलापूर रस्त्यावरील अपघातात राजेश थोरात व शेखर मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला.  Pudhari News Network
बीड

नगर-सोलापूर रस्त्यावरील अपघातात अंभोरा येथील २ तरुण जागीच ठार

पुढारी वृत्तसेवा

आष्टी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अंभोरा गावातील दोन युवक घोगरगाव येथे कामानिमित्त मोटार सायकलवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात नगर -सोलापूर रोडवर आज (दि.८) झाला. या अपघातात राजेश बबन थोरात (वय २८) व शेखर नवनाथ मिसाळ ( वय ३४) यांचा जागीच मृत्यू झाला.

राजेश बबन थोरात यांच्या पाठीमागे वडील एक भाऊ असा परिवार आहे. तर शेखर मिसाळ यांच्या पाठीमागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT