केज : केज तालुक्यात भर दिवसा घराचे लोखंडी गेट तोडून आतील पेटी व धान्याच्या कोठीत ठेवले २७ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञ यांच्या पथकाने भेट दिली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील कोरेगाव येथील वैतागवाडी नावाच्या वस्तीवर राहत येथे २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वा. च्या दरम्यान बळीराम भगवान तांदळे हे आणि त्यांची पत्नी शेतात गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी चॅनल गेटचे कुलुप तोडुन घरात असलेल्या पेटी आणि धान्याच्या कोठीत ठेवलेले आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, सोन्याचा हार, नेकलेस, मिनी गंठण, झुंबर, वेल, चैन, अंगठ्या, सोन्याची पोत, नथ, सोन्याची साखळी, सेव्हन पीस, सोन्याचे फुलं, सोन्याच्या काड्या असे दागिने एकूण २७ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे जुने दागिने ज्याची किंमत ५ लाख ८१ हजार ५०० रु दागिन्यांची चोरी झाली आहे.
बळीराम तांदळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे तपास करीत आहेत.