केज : केज पोलीस ठाण्यात बेवारस वाहने पडू आहेत. अद्यापपर्यंत त्यांची मालकी सिद्ध करून वाहनधारक ती वाहने घेवून गेलेले नाहीत. त्यामुळे त्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासंदर्भात केज पोलिसांनी परिवहन अधिकाऱ्यांकडून माहिती मागितली आहे. त्यानंतर या वाहनांची विल्हेवाट लावली जाणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून केज पोलिस ठाण्यामध्ये बेवारस दुचाकी वाहने पडून आहेत. २६ दुचाकी वाहनांच्या संदर्भात पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी विभागीय परिवहन अधिकाऱ्याकडे माहिती मागितलेली असून ती माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक आणि न्यायालयाच्या आदेशाने वाहनांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यातील दुचाकी वाहने कोणाच्या मालकीची असतील तर त्यांनी मालकी सिद्ध करून वाहनांची नोंदणी पुस्तिका आणि त्या संदर्भातील कागदपत्रे आणून केज पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा आणि पोलिस ठाण्यातून वाहने घेऊन जावीत, असेही आवाहन पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि दुय्यम अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी केले आहे.