अतूल शिनगारे
धारूर: नगरपरिषद किल्ले धारूर येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२४ संदर्भातील आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मुख्याधिकारी आजित ढोपे सह नगरपरिषद मधील निवडणूक विभागप्रमुखांसह अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली.
नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या या सोडतीला स्थानिक नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते. या सोडतीनुसार नगरपरिषद धारूर येथील एकूण १० प्रभागांतील २० जागांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे;
प्रभाग क्र. जागा क्रमांक आरक्षण
१. अ-सर्वसाधारण महिला
ब-अराखीव
२. अ-अनुसूचित जाती महिला
ब-अराखीव
३. अ-अनुसूचित जाती महिला
ब-अराखीव
४. अ-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
ब-अराखीव
५. अ-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग सर्वसाधारण
ब-सर्वसाधारण महिला
६. अ-सर्वसाधारण महिला
ब-अराखीव
७ अ-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग सर्वसाधारण
ब-सर्वसाधारण महिला
८ अ-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
ब-अराखीव
९ अ-अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब-सर्वसाधारण महिला
१० अ-अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब-सर्वसाधारण महिला
या सोडतीनंतर धारूरमधील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी विविध पक्षांनी आपापल्या प्रभागांत संघटनात्मक तयारी सुरू केली असून, संभाव्य उमेदवारांनी जनसंपर्काला वेग दिला आहे.