बीड : स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू असतानाच भरधाव पिकअप अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या गर्दीत घुसला. या दुर्घटनेत पिकअपखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू झाला तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.१५) बीडजवळील पाली येथील स्मशानभूमीत घडली.
पाली परिसरातील स्मशानभूमीत आसराबाई किसनराव नवले यांचा अंत्यविधी सुरू होता. यादरम्यान भरधाव वेगात एक पिकअप अत्यसंस्कार सुरू असताना या गर्दीत घुसला. यात संभाजी संभाजी विठ्ठलराव जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ ते दहाजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींवर शासकीय रुग्णालयासह इतर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.