जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटीत ठेवीदारांच्या 159 कोटींच्या ठेवी हडप करणारा मुख्य आरोपी बबन शिंदेला बीड पोलिसांनी अटक केली. Pudhari News Network
बीड

जिजाऊ माँ साहेब पतसंस्थेत 159 कोटींचा अपहार केलेल्या बबन शिंदेला बेड्या

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीडच्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटीत ठेवीदारांच्या 159 कोटींच्या ठेवी हडप करणारा मुख्य आरोपी बबन शिंदे याला बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील कृष्ण मंदिर परिसरातून अटक केली. विशेष म्हणजे बबन शिंदे हा संत महंतांचा वेश करुन या ठिकाणी वास्तव्यास होता.

बीडसह धाराशिव जिल्ह्यात शाखांचा विस्तार असलेल्या जिजाऊ माँ साहेब पतसंस्थेत 159 कोटींचा अपहार झाल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यापूर्वी 3 जुले 2023 पासून बबन शिंदे हा फरार झाला होता. तेव्हापासून तो वेश बदलून तसेच सिमकार्ड बदलून दिल्ली, नेपाळ, आसाम, ओरीसा, उत्तर प्रदेश अशा विविध ठिकाणी लपून राहत होता. त्याच्या मागावर बीड पोलिसांचे पथक होते. अखेर त्याला उत्तर प्रदेशात वृंदावन येथील कृष्ण मंदिर परिसरातील खोलीतून अटक करण्यात आली. या प्रकरणातील शिंदे हाच मुख्य आरोपी असून त्याच्या अटकेमुळे तपासाला गती येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT