कोल्हापूर

कोल्हापूर : हाय प्रोफाईल वेश्या अड्ड्याचा पर्दाफाश

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : उच्चभ्रूंची वसाहत समजल्या जाणार्‍या मध्यवर्ती ताराबाई पार्क, फाळके कपाऊंड मनीष पार्क परिसरातील रो बंगलोमध्ये बेधडक चालणार्‍या हाय प्रोफाईल वेश्या अड्ड्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने छापा टाकून पर्दाफाश केला. वेश्या अड्ड्याच्या मालकिणीसह एजंटाच्या मुसक्या आवळून दोघांना अटक करण्यात आली. खुशबू सादिक खाटीक (वय 36, रा. माळ गल्ली, कदमवाडी) व गौतम संजय धामेजा (21, इंदिरानगर झोपडपट्टी, गांधीनगर, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.

पथकाने एका पीडित महिलेची सुटका करून 73 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्ले यांनी दिली. शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या परिसरात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी एलसीबी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते.

खातरजमा करून अड्ड्यांवर छापा

एलसीबी पथकाने दोन दिवसांपासून सापळा लावून वेश्या अड्ड्याची खातरजमा केली होती. पोलिस निरीक्षक गोर्ले, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या सहायक निरीक्षक श्रद्धा आंबलेसह पथकाने छापा टाकून वेश्या अड्ड्यावरून एका पीडितेची सुटका करून संशयिता खुशबू खाटीकसह गौतम धामेजाला ताब्यात घेण्यात आले. उच्चभ—ू वसाहतीत सुरू असलेल्या परिसरात वेश्या अड्डा सुरू असल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच रहिवाशांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आर्थिक प्रलोभन दाखवून शरीरविक्रयास प्रवृत्त

मालकीण खुशबूने रो बंगला गहाणवट घेऊन गरीब व असहाय महिलांचा गैरफायदा घेऊन त्यांना आर्थिक प्रलोभन दाखवून अनैतिक व्यापार करण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे, असेही गोर्ले यांनी सांगितले. संशयितांना अटक करून शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. संशयितांवर यापूर्वीही कारवाई झालेली आहे का, याचीही चौकशी करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT