कोल्हापूर : सणासुदीच्या खरेदीवर लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देणार्या दैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफएम आयोजित ‘शॉपिंग उत्सव 2025’च्या पहिला लकी ड्रॉ मोठ्या उत्साहात काढण्यात आला. यामध्ये पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील सुनीता संजय मगदूम यांनी अर्धा तोळा सोन्याचे पहिले बक्षीस पटकावले.
विशेष योगायोग म्हणजे मंगळवारी (दि. 28) तनिष्कच्या दसरा चौक, कोल्हापूर येथील शोरूममध्ये हा लकी ड्रॉ काढण्यात आला आणि त्याच शोरूममधून मंगळसूत्र खरेदी केल्यानंतर भरलेल्या कूपनावर (कूपन क्रमांक 1866) मगदूम यांना हे मौल्यवान बक्षीस मिळाले. या भाग्यवान क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तनिष्कचे प्रसाद कामत, मेघनाताई कामत, जयाताई कामत, जय कामत, चिपडे सराफ यांच्याकडून मुरलीधर चिपडे, एस. एस. कम्युनिकेशनचे मनन पारेख, श्री. श्री. डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्सचे निखिल अग्रवाल, बळीराजा आटाचक्कीचे गणेश गाडे, क्लायमॅक्स अॅडव्हर्टायझिंगचे उदय जोशी ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, विभागीय इव्हेंट व्यवस्थापक बाळासाहेब नागरगोजे, सिनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर आणि सहायक जाहिरात व्यवस्थापक रिया भांदिगरे यांच्यासह जाहिरात प्रतिनिधी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तिसर्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या बक्षीस विजेत्यांची नावेही लकी ड्रॉद्वारे जाहीर करण्यात आली.
22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेपासून सुरू झालेला हा ‘पुढारी शॉपिंग उत्सव’ 2 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे तुळशी विवाहापर्यंत चालणार आहे. त्यामुळे सहभागी दुकानांमध्ये खरेदी करणार्या ग्राहकांना अजूनही कूपन भरून बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध आहे.
मी पहिल्यांदाच तनिष्कमध्ये खरेदी केली. मला विश्वास बसत नाही की, मला अर्धा तोळे सोन्याचे बक्षीस मिळाले. आमचे मूळ गाव मिणचे सावर्डे आहे. आम्ही ‘पुढारी’चे नियमित वाचक आहोत. ‘पुढारी’च्या शॉपिंग उत्सवाचे हे बक्षीस आम्हाला मिळाले, याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे.सुनीता संजय मगदूम, पेठवडगाव