हणमंतवाडी येथे मारहाणीत एकाचा मृत्‍यू झाला. File Photo
कोल्हापूर

कोल्‍हापूर : हणमंतवाडी येथे मारहाणीत एकाचा मृत्‍यू

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : हनुमंतवाडी (ता. करवीर) येथे झालेल्या मारहाणीत बाजीराव नरके (वय ५८) यांचा मृत्‍यू झाला. याबाबत करवीर पोलीस ठाण्‍यात रात्री उशिरापर्यंत गुन्‍हा दाखल करण्‍याची प्रक्रिया सुरु होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी, बाजीराव नरके पत्‍नीसह रहात होते. दाेन दिवसांपासून त्‍यांना मारहाण केली जात होती. यातूनच ते गंभीर जखमी झाले. बेशुध्‍दावस्‍थेत बुधवारी त्‍यांना उपचारासाठी सीपीआर मध्‍ये दाखल करण्‍यात आले. पण उपचारापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाला. नेमकी मारहाण कशामुळे झाली याचा पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी कोणालाही ताब्‍यात घेण्‍यात आले नव्‍हते. रात्री उशिरा त्‍यांच्‍या नातेवाईकांकडून गुन्‍हा दाखल करण्‍याची प्रक्रिया सुरु हेाती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT