Abuse on minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला 12 वर्षे सक्तमजुरी 
कोल्हापूर

Abuse on minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला 12 वर्षे सक्तमजुरी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अतुल संपतराव जाधव-पाटील (वय 30, रा. मनपाडळे, ता. हातकणंगले) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश (1) श्रीमती आर. व्ही. आदोने यांनी दोषी ठरविले. आरोपीला 12 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

ऑगस्ट 2015 पूर्वी वेळोवेळी हा प्रकार घडला होता. खटल्याची पार्श्वभूमी अशी ः पीडित मुलीच्या आईचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांकडे तिचे वास्तव्य होते. मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. पीडिता 7 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर अत्याचाराचा प्रकार उघड झाला.

याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात अतुल जाधव-पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश (1) श्रीमती आदोने यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षामार्फत सहायक सरकारी वकील अमृता ए.पाटोळे यांनी काम पाहिले. सहायक सरकारी वकिलांचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.

भारतीय दंड विधान संहिता कलम 452, 376 (2) (आय) (जे) (एन), 506 तसेच पोक्सो कलम 6 नुसार 12 वर्षे सक्तमजुरी, 15 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास 7 महिने 15 दिवस कैद तसेच दंडाच्या रकमेपैकी 7 हजार रुपये पीडितेला देण्याचा आदेश झाला आहे. खटल्याच्या निकालाकडे हातकणंगले, शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT