कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने ‘अमृत’ (महाराष्ट्र संसोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेद्वारे महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गड-किल्ल्यांचे महत्त्व जगाच्या नकाशावर ठसविण्यासाठी आणि पुढील पिढ्यांपर्यंत त्याचा वारसा पोहोचवण्यासाठी यंदाच्या दिवाळी कालावधीत ‘दुर्गोत्सव’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
दुर्गोत्सवा अंतर्गत वर्ल्ड हेरिटेजचे मानांकन प्राप्त रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेर दुर्ग, खांदेरीचा दुर्ग, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग आणि जिंजी या 12 किल्ल्यांपैकी कोणत्याही एका किल्ल्याची प्रतिकृती बनवायची आहे. किल्ल्याच्या प्रतिकृतीचा आकार कमीत-कमी दोन फूट असावा आणि जास्तीत जास्त कितीही असू शकतो. सेल्फी आणि नोंदणी : किल्ला तयार झाल्यावर, सहभागी व्यक्तीने त्या किल्ल्याच्या प्रतिकृतीसोबत एक सेल्फी काढायची आहे. किल्ल्यासोबतचा फोटो http:/// www. durgotsav. com या संकेतस्थळावर दि. 18 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कलावधीत अपलोड करायचा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र दिले जाईल. ‘अमृत विद्या’ या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवरील शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास व त्यातून आजच्या काळात घेण्याजोगे धडे या विषयावरील प्रशिक्षण निशुल्क उपलब्ध करून दिले जाईल.