करगणीतील दुचाकीस्वाराचा कागलजवळ नदीत पडून मृत्यू 
कोल्हापूर

Kolhapur Accident : करगणीतील दुचाकीस्वाराचा कागलजवळ नदीत पडून मृत्यू

देवदर्शनावरून परतताना घटना

पुढारी वृत्तसेवा

कागल : दूधगंगा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा नदी पात्रातील दगडावर आदळून जागीच मृत्यू झाला. दादा ज्ञानू पाटील (वय 37, रा. करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामाचे दर्शन घेऊन परतताना सिध्दनेर्ली येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झला.

दादा पाटील शेती व्यवसाय करीत होते. ते दुचाकीने (एमएच 10 2803) एकटेच आदमापूर येथे बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन आटोपून रात्री उशिरा गावाकडे परतत असताना दूधगंगा पुलावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी पुलाच्या लोखंडी अँगलला जाऊन अडकली. त्या क्षणी ते दुचाकीवरून उडाले आणि खाली नदी पात्रातील दगडावर आदळले. यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने पलायन केले. कागल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी ग््राामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT