आरटीओ कर्मचार्‍यांचा बेमुदत संप. File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : आरटीओ कर्मचार्‍यांचा बेमुदत संप सुरू

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचार्‍यांचा बेमुदत संप मंगळवारपासून सुरू झाला. संपामुळे आरटीओ कार्यालयातील कामकाज दिवसभर ठप्प झाले. कर्मचारीच नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

शासनमान्य आकृतिबंधानुसार अंमलबजावणी करून तातडीने पदोन्नत्या द्याव्यात, महसूल विभागानुसार बदली धोरण रद्द करावे, अतिरिक्त पदाचे समायोजन रद्द करावे आदी मागण्यांसाठी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. मोटार वाहन कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे.

वर्दळ असणार्‍या आरटीओ कार्यालयात संपामुळे सोमवारी दिवसभर शुकशुकाट पसरला होता. कर्मचार्‍यांनी काम बंद ठेवून प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने केली. संघटनेचे अध्यक्ष विशाल ठोंबरे, सचिव उस्मान मुजावर, अनिता रसाळ, विजयश्री बागडेकर, विजय चव्हाण, अवधूत पाटील, नितीन जाधव, नीलेश पवार, उमेश गीते, महेश कलकुटकी, राजरत्न कांबळे, स्मिता टिपुगडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT