पेठवडगाव : तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संकुलातील वसतिगृहात झालेल्या रॅगिंग आणि विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाणीच्या प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला . मारहणीचा व्हिडीओ व्हायरल होताच जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट उसळली होती.
9 मार्च रोजी या निवासी शाळेतील वसतिगृहात नऊ लहान विद्यार्थ्यांना मोठ्या वर्गातील पाच विद्यार्थ्यांनी कमरेचा पट्टा, प्लास्टिक बॅट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले होते. या घटनेचा मोबाईलवर व्हिडीओ काढण्यात आला होता. हा व्हिडीओ 10 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली. या घटनेची गंभीर दखल घेत विविध सामाजिक संघटनानी चौकशीची मागणी केली. त्यानंतर वडगाव पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेतले.