कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवातील ललिता पंचमी दिवशी मंगळवारी अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. परगावच्या भाविकांची मुख्य दर्शनरांगेसह मुखदर्शनासाठीही रांग लागली होती.
ललिता पंचमीनिमित्ताने अंबाबाईची पालखी त्र्यंबोलीच्या भेटीला गेल्यामुळे सकाळच्या सत्रात देवस्थानचे सर्व पदाधिकारी, सदस्य, भालदार, चोपदार, कर्मचारी पालखी मिरवणुकीच्या नियोजनात व्यस्त होते. त्यामुळे मंगळवारी अंबाबाईचे व्हीआयपी दर्शन बंद होते; मात्र पूर्व दरवाजातून देण्यात येणारे मुख्य दर्शन सुरू होते. दरम्यान, रात्री नऊ वाजता अंबाबाईचा पालखी सोहळा झाला. फुलांच्या माळांनी सजवलेल्या पालखीला मंदिराच्या पाच शिखरांचा आकार देण्यात आला होता.