कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालय बालरोगशास्त्र विभागातील डॉक्टरांनी आठ वर्षांच्या बालिकेला जीवदान दिले. ‘जीबीएस’ या प्राणघातक आजाराशी दोन महिने लढल्यानंतर शरयू अरुण चव्हाण हिला नवजीवन मिळाले आहे.
यादवनगर येथील शरयूची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर बनल्याने तिला 22 मार्च रोजी सीपीआर येथे दाखल केले. तिच्यावर व्हेंटिलेटवर उपचार सुरू होते.
वैद्यकीय पथकात बालरोग विभागप्रमुख डॉ. संगीता कुंभोजकर, प्रा. डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. भूषण मिरजे, डॉ. महेश्वरी जाधव, डॉ. नीलेश कुंभार यांच्यासह अन्य डॉक्टर, नर्सिंग इन्चार्ज मीना पंडित, मीना डिसुझा, समाज सेवाअधीक्षक अजित भास्कर यांनी परिश्रम घेतले. वैद्यकीय पथकाला अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने यांचे मार्गदर्शन लाभले.