कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवार, दि. 21 फेब—ुवारीपासून दहावीच्या परीक्षेस सुरुवात होत आहे. कोल्हापूर विभागातून एक लाख 32 हजार 926 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापूर बोर्डाच्या वतीने दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व साहित्य परीक्षा केंद्रांवर पोहोच करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागात 2 हजार 435 शाळा तर 357 परीक्षा केंद्रे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून 54,810, सांगली 39,619 तर सातार्यातून 38,497 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी 45 परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रावर एक तास तर परीक्षा दालनात किमान अर्धा तास उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी बोर्डाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अध्यक्ष क्षीरसागर यांनी केले आहे.