सिंधुदुर्गच्या राजाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.  
सिंधुदुर्ग

कुडाळ येथील सिंधुदुर्गच्या राजाला भक्तीमय वातावरणात निरोप!

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : गणपती बाप्पा मोरया... मंगलमुर्ती मोरया...च्या जयघोषात, फटक्यांच्या आतषबाजीत, डाॅल्बीच्या ठेक्यात भक्तिमय वातावरणात कुडाळ येथील सिंधुदुर्गच्या राजाची सोमवारी (दि.२३) सायंकाळी सतराव्या दिवशी कुडाळ शहरातून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पावशी येथील तलावात श्रींचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान कुडाळ शहरासह तालुक्यात सतरा दिवसांच्या गणपतींना ढोलताशांच्या गजरात थाटात निरोप देण्यात आला. बाप्पांना निरोप देण्यासाठी पावसाने हजेरी लावली होती.

भाजप नेते खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने यंदा येथील भाजप कार्यालय समोरील पटांगणात सिंधुदुर्गचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव सतरा दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. सोमवारी सायंकाळी माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत राजाची पूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली.

कुडाळ पोस्ट ऑफीस चौक, गांधीचौक मार्गे काळपनाका, पावशी घावनळे फाटा येथून पावशी तलावापर्यंत ही विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रणजित देसाई, संजू परब, संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, विनायक राणे, राजू राऊळ, आनंद शिरवलकर, बंड्या सावंत, संध्या तेरसे, दीपलक्ष्मी पडते, रेखा काणेकर, प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, चांदणी कांबळी, विलास कुडाळकर यांच्यासह सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी उशिरा पावशी येथील तलावात सिंधुदुर्गच्या राजाला निरोप देण्यात आला. दरम्यान तालुक्यात सतरा दिवसांच्या गणपतींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT