सिंधुकन्या पूर्वाला रौप्य 
सिंधुदुर्ग

Purva Sawant silver medal : सिंधुकन्या पूर्वाला रौप्य

दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः रांची येथे झालेल्या चौथ्या दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राची 22 वर्षीय खेळाडू तथा सिंधुदुर्गची सुकन्या पूर्वा हितेश सावंत हिने महिलांच्या ट्रिपल जंपमध्ये 13.03 मीटर उडी घेत रौप्यपदक पटकावले.

पूर्वा हिने श्रीलंकेच्या खेळाडूला मागे टाकत हे यश मिळवले. आतापर्यंत तिने ट्रिपल जंप प्रकारात वैयक्तिक दोन आंतरराष्ट्रीय पदके मिळवली आहेत. या यशातून तिने भारत देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल तिचे माजी आ. वैभव नाईक यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कुडाळ तालुक्यातील भडगाव गावचे सुपुत्र उद्योजक हितेश सावंत यांची पूर्वा ही कन्या असून मुंबईच्या सोमैया स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीशी संलग्न राहून तिने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. यावर्षी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक रौप्य पदक पटकाविणारी महाराष्ट्राची ती पहिली मुलगी ठरली आहे. महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनने तिचे अभिनंदन केले आहे. पूर्वाच्या यशाने युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून महाराष्ट्र राज्य सरकारने अशा खेळाडूंना पाठबळ देण्याची मागणी होत आहे.

देशाला आणखी पदके मिळवून देण्यासाठी प्रयत्न

या यशाबद्दल बोलताना पूर्वा म्हणाली, हे यश मिळविण्यासाठी मला माझे आई, वडील आणि माजी आ. वैभव नाईक तसेच कोच, अ‍ॅकॅडमीतील सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले. हे पदक माझ्या मेहनतीचे फळ आहे. भारत देशाला आणखी पदके मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहणार असल्याचे तिने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT