हायस्पीड बोटींची जप्त केलेली जाळी 
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : मालवण समुद्रात मलपी हायस्पीड बोटींचा धुमाकूळ

पुढारी वृत्तसेवा

मालवण : मालवण समुद्र किनारपट्टीवर कर्नाटक मलपी येथील हायस्पीड बोटींनी धुमाकूळ घातला आहे. मोठ्या संख्येने या बोटी अगदी 10 वाव क्षेत्रात घुसून मासळीची लयलूट करत आहेत. मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

याबाबत स्थानिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाचे वारंवार लक्ष वेधल्यानंतर शीतल ही गस्ती नौका कार्यान्वित करून मत्स्य परवाना अधिकारी भालेकर व पोलिस कर्मचारी लुडबे व टीम अशी संयुक्त गस्त शुक्रवारी करण्यात आली. देवबाग तारकर्ली समोर सुमारे 14 वाव खोल समुद्रात जाळी टाकून मासेमारी करणार्‍या सुमारे 30 पेक्षा जास्त हायस्पीड बोटिंच्या जवळ गस्ती नौका येत असल्याचे पाहून हायस्पीड बो्टींनी पळ काढला. त्या हायस्पीड नौकांची कापलेली जाळी मत्स्य परवाना अधिकारी भालेकर यांनी जप्त केली आहेत. तसेच गस्ती नौकेच्या माध्यमातून कारवाई अशीच सुरु राहील असे स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT