सावंतवाडी : गोवा दारूची वाहतूक करणारी कार पाठलाग करून आंबोली -दाणोली नानापाणी येथे पकडण्यात आली. याप्रकरणी इचलकरंजी येथील दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
संशयित प्रवीण ईश्वर जाणवेकर (50) व संतोष दिनकर माने (44) हे अँबेसिडर कार मधून गोवा बनावट दारूच्या विविध ब्रँडच्या सुमारे 250 बाटल्यांची वाहतूक करत होते.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सरदार पाटील, आंबोली दूरक्षेत्राचे अंमलदार रामदास जाधव, गौरव परब, जमादार आंबेरकर, हवालदार रुक्मानंद मुंडे यांनी केली.