रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यातून केंद्र शासनाच्या पेयजल संवादासाठी रत्नागिरी जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या सादरीकरणाचे जलशक्ती मंत्रालयाने केले आहे. जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. याची दखल देखील शासनाने घेतली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील जिल्ह्यांमध्ये नवोन्मेष आणि समुदाय सहभागाच्या माध्यमातून उल्लेखनीय काम झालेले आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये परस्पर-शिक्षण आणि प्रतिकृतीसाठी अशा सर्वोत्तम पद्धती शिकणे आणि सामायिक वापर करणे आवश्यक आहे.
या उद्देशाने, जलशक्ती मंत्रालय, पेयजल एवं स्वच्छता विभाग, जल जीवन मिशन, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या मार्फत निवडक जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याद्वारे योजनांच्या प्रभावी संचालन आणि देखभालीसाठी जल जीवन मिशन अंतर्गत त्यांच्या जिल्ह्याची कामगिरी, नवोपक्रम आणि अनुभव सादर करण्यासाठी पेयजल संवाद व्यासपीठ मंगळवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.वैदेही रानडे यांनी ग्रामपंचायत इंदवटी, महसुल गाव निवोशी, ता.लांजा, जि.रत्नागिरी येथील क्रांती उत्पादक महिला स्वयंसहायता बचत गटाने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचे पेयजल संवाद कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या समवेत सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर जलशक्ती मंत्रालयाचे मुख्य सचिव अशोक के.के.मिना यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत तसेच देखभाल- दुरुस्तीसाठी निवड करण्यात आलेल्या स्वयंसहायता बचत गटाचे ही अभिनंदन व कौतुक केले.