रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नोकरी, व्यवसायानिमित्त असलेल्या प्रवाशांसाठी दिवाळीनिमित्त 250 पेक्षा अधिक जादा बसेसचे आयोजन करण्यात आले असून, प्रवाशांनी लाल परी हाऊस फुल्ल झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई, मराठवाड्याच्या दिशेने एसटी बसेस रवाना होत आहेत. दि. 16 ते 5 नोव्हेंबरपर्यंत जादा व आरक्षित बसेस सोडण्यात येणार आहेत.
नोकरी, व्यवसायानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात असलेले नागरिक दिवाळीनिमित्त हमखास आपल्या गावी जात असतात. तसेच काहीजण पर्यटन तर काहीजण मामाच्या गावाला जात असतात. प्रवासासाठी नागरिक लाल परीलाच पसंती देत असतात. दिवाळीनिमित्त नागरिकांचा प्रवास चांगला, सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने आरक्षण बसेस, जादा बसेसचे नियोजन केले आहे. कित्येक गाड्या आरक्षित झालेल्या आहेत. तर काहीठिकाणी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. 16 ऑक्टोबरपासून रत्नागिरी आगारासह विविध आगारांतून बसेस पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.तब्बल 5 नोव्हेंबरपर्यंत या फेर्या चालणार असल्याचे एसटी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.