आरवली ः माखजन विभागात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून इच्छुकांची संख्या तब्बल 20 वर गेली आहे. यामुळे उमेदवारी देण्याचा निर्णय आमदार शेखर निकम यांच्यावर सोडण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांनी मागील निवडणुकीचा आढावा घेतला. या बैठकीत प्रचार संयोजन समितीचे गठण करण्यात आले. धामापूर गणातून तेजल चव्हाण, तुकाराम मेस्त्री, सुप्रिया सुर्वे, गजानन सुर्वे, अक्षय चव्हाण, अंकिता चव्हाण, रूपेश गोताड, उमेश महाडिक, शेखर उकार्डे, सुबोध चव्हाण, रमेश बाचिम, लवू सुर्वे. आरवली गणातून धनश्री मेणे, प्रिया सुवरे, शैहनाज कापडी तर धामापूर जि. प. गटातून पंचायत समिती माजी सदस्य जाकीर शेकासन, सुशील भायजे, तेजल चव्हाण, गजानन सुर्वे आणि कृष्णा मेणे असे 20जण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने ही सर्व नावे पार्लेमेंटरी बोर्डाकडे पाठविण्यात येतील, असे राजेंद्र पोमेंडकर यांनी सांगितले. दरम्यान, आपण पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणू असे सर्व कार्यकत्यांनी सांगितले. तसेच आमदार शेखर निकम जो उमेदवार ठरवतील तो उमेदवार मान्य असेल असे सर्व इच्छुकांनी एकस्वराने सांगितले.
यावेळी अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, जिल्हा परिषद माजी सदस्य दीपक जाधव, पं.स. माजी सदस्य नाना कांगणे, जिल्हा कार्याध्यक्ष सुशील भायजे, उपाध्यक्ष तुकाराम येडगे, तालुका उपाध्यक्ष गणपत चव्हाण, शशिकांत घाणेकर, शेखर उकार्ड, महेश बाष्टे आदींनी आपले विचार मांडले. बैठकीला आरवली सरपंच निलेश भुवड, सुनील गांगरकर, सुलतान कापडी, गजानन सुर्वे, अक्षय चव्हाण, शफी मादरे, प्रवीण भुवड, गोमाणे, उमेश महाडिक, शफी शहा, दीपिक शिगवण, रूपेश गोताड, प्रकाश वीर, वैभव मते, अमित माचिवले, समीर लोटणकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.