रत्नागिरीचे मेडिकल कॉलेज राज्यात प्रथम Pudhari Photo
रत्नागिरी

Ratnagiri Medical College | रत्नागिरीचे मेडिकल कॉलेज राज्यात प्रथम

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तर्फे ऑगस्ट 2025 मध्ये घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष एम.बी.बी.एस परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने उत्तुंग यश मिळविले आहे.

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तर्फे ऑगस्ट 2025 मध्ये घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष एम.बी.बी.एस परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने उत्तुंग यश मिळविले आहे. या संस्थेचा निकाल महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 100 टक्के लागला आहे.

सन 2024 या वर्षी झालेल्या प्रथम वर्ष एम. बी. बी. एस परीक्षेमध्ये देखील महाविद्यालयाचा निकाल राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 99 टक्के इतका लागला होता. या यशाबद्दल पालकमंत्री डॉ. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद तसेच सर्व अध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर 95 टक्के, ग्रॅन्ट शासकीय

वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई 94.42 टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज - 94.40 टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला 94.20 टक्के, टोपीवाला नॅशनल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई 94.07 टक्के, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय मुंबई -93.93 टक्के, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर - 93 टक्के यांच्यासह अन्य जिल्हा शासकीय वैद्यकीय म्ाहाविद्यालयांहून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

औषधशास्त्र 8, सूक्ष्मजीवशास्त्र 7 व विकृतीशास्त्र विषयात 5 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांचेही पालकमंत्री उदय सामंत यांनी अभिनंदन केले आहे. रत्नागिरीचे शासकीय महाविद्यालय हे राज्यातील पहिले एसी महाविद्यालय आहे. प्राध्यापकांची संख्या कमी असूनही गेस्ट लेक्चरर आणत यावर महाविद्यालय प्रशासन, अधिष्ठाता डॉ. रामानंद व पालकमंत्र्यांनी अडचणींवर मात करीत, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT