दुर्मीळ फुलपाखरू 
रत्नागिरी

रत्‍नागिरी : खानवली येथे आढळले दुर्मीळ फुलपाखरू

पुढारी वृत्तसेवा

लांजा : लांजा तालुक्यातील खानवली बेनी येथे दुर्मीळ असे पोपटी रंगाचे परिप्रमाणे दिसणारे फुलपाखरू आढळले आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव वारीसे यांनी या फुलपाखराचे चित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे.

अमेरिकेच्या उत्तर भागात हे फुलपाखरू सर्वसाधारणपणे आढळते, असे सांगण्यात येते. यापूर्वी राजापूर तालुक्यातील हातिवले कॉलेजच्या प्राध्यापकांना अँक्टीनासल्युना हे फुलपाखरू आढळून आले होते. सध्या निसर्गामध्ये विविध प्रजातींची फुलपाखरे आढळून येत असल्याने निसर्ग प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. खानवली बेनी येथे आढळलेल्या फुलपाखराच्या पंखाची रचना परिप्रमाणे आहे. पंखांचा रंग फिकट पोपटी असून हे फुलपाखरू भारतात क्वचित आढळते. याच्या पंखावर चंद्रासारखे गोलकार आहेत. ते चंद्रगोलाकार कलेकलेनी वाढत जावून त्याचा पुर्ण चंद्र होतो. यापूर्वी आसाममध्ये 2010 सालात सोनेरी जंगलात या जातीचे फुलपाखरू आढळून आले होते. राजापूर, लांजा तालुक्यात गेल्या काही वर्षापासून दुर्मीळ फुलपाखरू आढळून येत आहेत. यात माऊल मॉथ, मनू मॉथ, सिल्क मॉथ आणि ऍटलास या दुर्मीळ फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या होत्या. आता यामध्ये आणखी एका अमेरिकन दुर्मीळ फुलपाखराची भर पडली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT