रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षर झोडपून काढले आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यातच जिल्ह्यातील 29 धरणे फूल्ल भरली आहेत. रविवार दि.29 जून रात्री व दिवसा 139 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला 30 जून ते 3 जुलैपर्यंत ऑरेंज आलर्ट देण्यात आला असून येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मे महिन्याच्या शेवट्याच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने राज्यासह कोकणाला अक्षरशा झोडपून काढले. त्यानंतर मान्सूनच्या पावसाने ही दमदार हजेरी लावल्यामुळे ठिकठिकाणी पूर परिस्थती, वीज पडून काहींचा मुत्यू झाला, तर काहींचे जनावरे मृत्यूमुखी पडली, घरांची पडझड होवून लाखोंचे नुकसान रत्नागिरी करातील नागरिकांचे झाले आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ही विस्कळीत झाली होती.रस्ते खचले होते. विशेषता चिपळूण, खेड, राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागात पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरी शहरात पावसाचा जोर कमी आहे मात्र तालुक्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. सततच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ होत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे रस्ते चिखलमय होत आहेत तर सखल भागात पाणीच पाणी साचत आहे. दुसरीकडे भर पावसात कोकणातील शेतकरी भाताची पेरणी, लागवण करीत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 85 टक्यांपेक्षा जास्त पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, येत्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज आलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
रत्नगिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, रायगड, सातारा, पुणे, सातरा घाट, कोल्हापूर घाट या तालुक्यांना ऑरेंज आलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.