रत्नागिरी : एसटीच्या मद्यपी कर्मचार्यांना पकडण्यासाठी राज्यभरात एकाचवेळी एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्यांकडून विशेष तपासणी मोहीम घेण्यात आली. यामध्ये दीड हजारांहून अधिक संशयित कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात 7 जणांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे आता एसटीचे चालक-वाहक इतर कर्मचारी वॉच ठेवण्यासाठी भविष्यात येणार्या एसटी बसेसमध्ये चालाच्या समोर ब्रेथ अॅनालिसिस यंत्र (अल्कोहोल तपासणीसाठी) बसविण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्या मद्यपी कर्मचार्यांचा अटकाव होणार आहे.
एसटी ही गोरगरीब प्रवाशांची वरदायिनी म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी लालपरीतून प्रवास करीत असतात. वाट पाहीन मात्र लालपरीनेच प्रवास करणार म्हणून लाखो प्रवासी एसटीतून प्रवास करीत आहेत. मात्र, काही एसटी कर्मचारी कर्तव्यावर असताना दारू पिऊन एसटी चालवत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात घालत असतात. असे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले ही दिसून आले. मोठ्या प्रमाणात चालक-वाहकांची तक्रार आल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने मद्यपी कर्मचार्यांवर चाप बसवण्यासाठी अचानक कोणालाही न सांगता एसटीच्या सुरक्षा, दक्षता खात्यांकडून रत्नागिरीसह नाशिक, परभणी, नांदेड, धुळे, भंडारा यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यात संशयित चालक, वाहक, यांत्रिक कर्मचार्यांची तपासणी मोहीम घेण्यात आली. यामध्ये सात कर्मचार्यांवर निलंबित कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा ही एसटी महामंडळाची प्राथमिकता असल्यामुळे भविष्यात नवीन येणार्या बसेसमध्ये चालकाच्या समोर ब्रेथ अॅनालिसिस (यंत्र अल्कोहोल तपासणीसाठी बसवण्यात येणार आहे. त्यामुळे चालक, वाहकासह इतर कर्मचार्यांवर चाप बसणार एवढं मात्र निश्चिंत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाबाहेर एसटी बस घेवून जाणारे चालक वाहकांची तपासणी होणे आवश्यकच आहे. दररोज नोकरदार, व्यापारी, शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करीत असतात. येथील रस्ते चढ-उतार, घाट आहेत. त्यामुळे चालक वाहक मद्यपी पिणारा असल्यास धोकादायक आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्या जाऊ शकतो. रत्नागिरी विभागातील जिल्हाबाहेर, जिल्हांतर्गत असणार्या चालक-वाहकांची तपासणी जिल्हालेवलवर सहा, दरवर्षी आवश्यक असल्याची चर्चा प्रवाशांमधून होत आहे.
रत्नागिरी विभागात ही सुरक्षा व दक्षता समितीच्या वतीने एसटीतील चालक, वाहक, यांत्रिक कर्मचार्यांची तपासणी झालेली आहे. विभागात कोणत्याही कर्मचार्यांवर कारवाई झालेली नसून तसा रिपोर्ट ही नाही.-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी