कोपरगाव येथे तरुणावर गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले.  Pudhari Photo
अहमदनगर

कोपरगाव येथे कारवर गोळीबार; तरुण जखमी, हल्लेखोर पसार

पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरात पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर नवश्या गणपती मंदिरानजीक आज (दि.१९) भरदिवसा साडेचार वाजता गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. (Ahmednagar Crime News )

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहरातील श्री नवश्या गणपती मंदिरजवळ कारमधून चाललेल्या एका तरुणावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात तणवीर हनीफ रंगरेज (वय ३६) हा तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला उपचारासाठी तत्काळ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असून शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. घटनास्थळावरून कार (एम एच 42, 14 61) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गोळीबारात कारच्या दोन बाजूच्या काचा फुटल्या आहेत. हल्लेखोरांनी सहा राऊंड केल्याची माहिती आहे, घटनास्थळावरून पाच काडतुसे पोलिसांना मिळून आली आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT