Latest

१७ वर्षाची देवनंदा ठरली देशातील सर्वांत कमी वयाची अवयवदाता; पित्याला दिले यकृत

दिनेश चोरगे

तिरुवनंतपूरम;  वृत्तसंस्था :  केरळ मधील त्रिशूर येथील एका १७ वर्षांच्या मुलीने पित्याला लिव्हर (यकृत) डोनेट केले. देवनंदा असे तिचे नाव असून, ती देशातील सर्वांत कमी वयाची अवयवदाता ठरली आहे. तिचे वडील प्रतीश यांना जगवायचे तर यकृत प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

अवयवदानाबाबतीत देशात लागू असलेल्या कायद्यान्वये १८ वर्षांखालील लोक अवयवदान करू शकत नाहीत. त्यामुळे देवनंदाने केरळ हायकोर्टाचे दार ठोठावले आणि विशेष परवानगी मिळविली. तिने पित्यासाठी केलेला संघर्ष पाहून रुग्णालयाने शस्त्रक्रियेचे बिलही घेतले नाही. विशेष म्हणजे पहिल्या चाचणीत देवनंदा यकृतदानासाठी फिट ठरली नव्हती. मग तिने सकस आहार व नियमित व्यायामाच्या बळावर स्वतःच्या तब्येतीत सुधारणा घडवून आणली. देवनंदाने परिचयातील काहींना यकृतदानासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी त्यासाठी ३०-४० लाख रुपये मागितले होते. एवढी रक्कम जमविणे अशक्यच होते. न्यायालयानेही तीन डॉक्टरांची समिती देवनंदाने यकृतदान करणे योग्य ठरेल की नाही, ते ठरविण्यासाठी नेमली होती. पहिल्यांदा तर समितीने नकारच दिला. पण सारेच नकार देवनंदाच्या जिद्दीसमोर होकारात बदलत गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT