Latest

हवा, पाण्यापासून बनवले विमानाचे इंधन

Arun Patil

माद्रिद : विमानातील जेट फ्युएल कसे बनते हे माहिती आहे का? असा प्रश्न कुणी विचारला तर आपण सांगू 'क्रूड ऑईल' म्हणजेच कच्चे तेल. मात्र, अशा कू्रड ऑईलशिवाय आपण हवेपासूनही जेट फ्युएल मिळवू शकतो असे म्हटले तर अनेकांना याबाबत आश्चर्यच वाटेल. वैज्ञानिकांनी आता हे शक्य करून दाखवले आहे. स्पेनच्या मोस्टोल्समधील संशोधकांनी एका बाह्य प्रणालीच्या सहाय्याने असे इंधन बनवून दाखवले आहे जे जेट फ्युएलमध्ये वापरता येऊ शकते. सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे कण यांच्या सहाय्याने असे इंधन प्रथमच बनवण्यात आले.

हे इंधन सोलर केरोसिन पेट्रोलियनपासून मिळणार्‍या जेट फ्युएलचा पर्याय बनू शकते, जे विमानातून उत्सर्जित होणार्‍या ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण कमी करू शकते. 'इटीएच ज्युरिख'चे इंजिनिअर एल्डो स्टीनफेल्ड यांनी सांगितले की या प्रक्रियेपासून मिळणार्‍या इंधनाचे ज्वलन झाल्यावर तितकाच कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो जितका त्याच्या निर्मितीसाठी वापरला जातो.

त्यामुळे हे इंधन 'कार्बन न्यूट्रल' ठरते. सुमारे 5 टक्के मानवनिर्मित ग्रीन हाऊस गॅसेससाठी विमानोड्डाण क्षेत्र जबाबदार आहे. अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीचे रासायनिक भौतिक वैज्ञानिक अ‍ॅलेन स्टेचेल यांनी सांगितले की जेट फ्युएलला कायमस्वरूपी पर्याय शोधणे कठीण बनलेले आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या विमानांसाठी.

जेट फ्युएलमध्ये अतिशय जास्त ऊर्जा असते. त्यामुळेच त्यांना पर्याय सापडत नाही. 2015 मध्ये स्टेनफेल्ड आणि त्यांच्या सहयोगींनी प्रयोगशाळेत सौर जेट फ्युएल बनवले होते, मात्र कुणीही त्याचा एक सिंगल सिस्टीमच्या माध्यमातून बनवले नाही. स्टेनफेल्ड आणि त्यांच्या टीमने 169 काचांचा वापर करून सूर्यप्रकाशाला एका 15 मीटरच्या टॉवरवर फोकस केले. या रिअ‍ॅक्टरमध्ये एक खिडकी होती, तिच्या माध्यमातून प्रकाश आत जाऊ शकत होता.

त्यामध्ये सेरिया नावाचा कॅमिल लावला होता ज्यामध्ये छोटी छोटी छिद्रे होती. ज्यावेळी सूर्याची उष्णता सेरियाला तापवत असे त्यावेळी तिने कार्बन डायऑक्साईड व पाण्याच्या वाफेबरोबर प्रक्रिया केली. त्या माध्यमातून सिंगॅस म्हणजेच हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईडचे मिश्रण तयार झाले. टॉवरच्या एका पाईपमधून सिंगॅस किंवा सिनगॅस खाली येतो व एका मशिनच्या माध्यमातून केरोसिन व अन्य हायड्रोकार्बनमध्ये रूपांतरीत होतो. नऊ दिवसांमध्ये 5,191 लिटर सिनगॅस संशोधकांनी मिळवला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT