Latest

सोलापूर : गोळीबाराच्या वादातून खुनाचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्‍तसेवा :  तुझ्यामुळे गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला आहे असे म्हणून तरुणावर कोयता, तलवारीने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या तिघांविरुद्ध बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विश्‍वेश्‍वर ऊर्फ पिल्या दिलीप लंगडे (वय 23, रा. वाणी प्लॉट, बार्शी) यांने दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत ऊर्फ सोन्या हाजगुडे, श्रीरंग वीर आणि ज्ञानेश्‍वर वीर (सर्व रा. वाणी प्लॉट, बार्शी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 जून रोजी रात्री आठच्या सुमारास विश्‍वेर लंगडे याच्या घरात घुसून प्रशांत हाजगुडे, श्रीरंग वीर व ज्ञानेश्‍वर वीर यांनी लंगडे यास शिवीगाळ करून तुझ्यामुळे माझ्यावरती गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला आहे, तुला आता आम्ही जिवंत सोडत नसतो असे म्हणून लंगडे याच्या डोक्यात कोयता, काठीने मारहाण करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. यावेळी ज्ञानेश्‍वर वीर याने तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला असता लंगडेने तो चुकविला. यावेळी भांडण सोडविण्यास आलेल्या लंगडेच्या आईला व बहिणीलाही मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. म्हणून बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT