Latest

सातारा : परीक्षेसाठी निघालेला विद्यार्थी अपघातात ठार

सोनाली जाधव

वेणेगाव : पुढारी वृत्तसेवा

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वळसे (ता. सातारा) गावच्या हद्दीत रविवारी दुचाकी व अज्ञात वाहनाची काल सकाळी 7.45 वाजता धडक झाली. यामध्ये परीक्षेसाठी निघालेला आयटीआयचा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ऋषिकेश चंद्रकांत गोळे (वय 21, रा. गोळेवाडी, ता. महाबळेश्‍वर) असे मृताचे नाव आहे. तर अविनाश दिलीप गोळे (रा. करहर, ता. जावली) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

ऋषिकेश हा रविवारी आयटीआयच्या परीक्षेसाठी मसूरला निघाला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र अविनाश हाही होता. वळसे गावच्या हद्दीत दुचाकी आली असता अज्ञात वाहनाला दुचाकीची धडक झाली. या अपघातात ऋषिकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अविनाश हे गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT