Latest

सर्वोत्तम महिला क्रिकेट चमूत एकही भारतीय खेळाडू नाही!

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : यंदाच्या महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडच्या संघाला तडाखा देऊन झळाळता विश्वचषक जिंकला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या विश्वचषकातील सर्वोत्तम महिला संघात ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंना जागा मिळाली आहे. याशिवाय इतरही संघांच्या खेळाडूंना संधी मिळाली असून, भारतीय महिला संघातील मात्र एकाही खेळाडूला यामध्ये संधी मिळालेली नाही.

आयसीसीने नुकताच हा संघ जाहीर केला. ज्यामध्ये चार ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू असून, त्यानंतर सर्वाधिक म्हणजे तीन दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडू आहेत. इंग्लंडच्या दोन खेळाडू अंतिम 11 मध्ये, तर एकीला बारावी खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने सातव्यांदा विश्वचषक जिंकताना इंग्लंडला धूळ चारली. अंतिम सामन्यात या संघाने इंग्लंड संघाला 71 धावांनी पराभूत केले. यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली या सामन्याची मानकरी ठरली. तिने 138 चेंडूंत 170 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. विशेष म्हणजे, एलिसा ही ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा खेळाडू मिशेल स्टार्कची पत्नी आहे.

आयसीसीने जाहीर केलेला संघ : (सर्वोत्तम महिला)

मेग लॅनिंग (कर्णधार), एलिसा हिली (यष्टिरक्षक), राचेल हेन्स, बेथ मूनी (सर्व ऑस्ट्रेलिया), लॉरा व्होल्व्हार्ट, मॅरिजान कॅप, शबनीम इस्माईल (सर्व दक्षिण आफ्रिका), सोफी एक्लेस्टोन, नेट साईव्हर (दोघी इंग्लंड), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीज), सलमा खातून (बांगला देश), बारावी खेळाडू – चार्ली डीन (इंग्लंड).

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT