Latest

बळजबरीने तरुणीचा घेतला किस! चालत्या रिक्षामध्ये उडी मारून कृ्त्य (video)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बळजबरीने तरुणीचा घेतला किस : जगभरातील महिला सुरक्षा विषय आता चिंतेची बाब झाली आहे. पाकिस्तानमध्ये महिलेला शेकडो पुरुषांनी मारहाण करून हवेत फेकून कपडे फाडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही? याची चर्चा रंगली आहे.

बळजबरीने तरुणीचा घेतला किस

नवीन व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला ओपन रिक्षामधून प्रवास करताना दिसत आहेत. रस्त्यावर मोठी गर्दी असल्याने रिक्षा संथगतीने जात असल्याचा फायदा घेत एका विकृताने रिक्षाच्या फाळक्यावर उडी मारून आत बसलेल्या तरुणीचा गालावर किस घेतला.

हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाकिस्तानमधील लाहोर शहरामधील असल्याचे बोलले जात आहे. दोन महिला एका मुलासह रिक्षाच्या मागील बाजूस बसल्याचे दिसून येते. रिक्षामधील दोन तरुणी पाहून अनेक मोटारसायकल त्यांचा पाठलाग करत छेडछाड करत असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे त्या महिला संतापलेल्या दिसून येतात.

याच व्हिडिओमध्ये यामधील एक महिला पाठलाग करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी चप्पल हातात घेतल्याचे दिसून येते. छेडछाडीला वैतागलेली महिला अत्यंत उद्विग्न होऊन रिक्षातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, पण तिला दुसरी महिला थांबवत असल्याचे दिसते.

पाकिस्तानी स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. त्यावेळी आनंद साजरा करतानाच हा घृणास्पद प्रकार घडला आहे.

रिक्षाच्या भोवती कार आणि मोटारसायकलचा ताफा दिसून येतो. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अनेक लोकांनी अत्यंत कडक कारवाईची मागणी केली आहे.

हे ही वाचलं का?

https://youtu.be/StsVFW0XFyI

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT