Latest

चंद्रपूर : तब्बल ११ तासानंतर बिबट्याने फरफटत नेलेल्या राजचा मृतदेह सापडला

सोनाली जाधव

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर  येथील १६ वर्षीय राजला गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून जंगलाच्या दिशेने फरफटत नेऊन ठार केले. त्यानंतर आज सकाळी अकराच्या सुमारास दुर्गापूर वेकोली वर्कशॉप परिसरात मृतदेह आढळून आला. (leopard attack)

leopard attack छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह

दुर्गापूर ग्रामपंचायतच्या मागील भागात नेरी परिसरात राजचे घर आहे.  याच परिसरात वेकोलीचा भाग आहे.  भागात झाडी वाढली आहे. राज रात्री घराशेजारुन निघाला असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. आणि त्याला फरफटत जंगलाच्या दिशेने घेऊन गेला.  घटनेची माहिती दुर्गापूर पोलीस व वनविभागाला देण्यात आली. रात्री पासून पोलीस प्रशासन, वनविभाग व नागरिकांनी शोधमोहीम राबविली. आज शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास वेकोलीच्या वर्कशॉप परिसरात मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. तब्बल ११ तास शोधमोहिम राबविण्यात आली होती. मृतदेहाचा काही भाग बिबट्याने खाल्ला होता.  मृतदेहाजवळ मोबाईल आढळला आहे.

२४ तासांत दोन घटना

दुर्गापूर परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ-बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. बुधवारी रात्री (52 वर्षीय) भोजराज मेश्राम हा कामगार महाऔष्णिक वीज केंद्रातून घरी परत येत असताना आडमार्गात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्‍यांनाही वाघाने जंगलाच्या दिशेने फरफटत नेले होते. त्यानंतर काल (गुरुवार) त्यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना घडली असतानाच राजला ठार केले. दोन्ही घटना थेट गावातच घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाघ-बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

रात्रीच्या सुमारास वाघ, बिबटे थेट  गावाशेजारी दबा धरून राहत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे.  हा परिसर ताडोबा अभयारण्याला लागून  असल्याने अभयारण्याबाहेर वाघ,  बिबटे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाघ-बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT