Latest

उर्फी जावेद, सनी लिओनी पुन्हा घालणार धुमाकूळ…

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : उर्फी जावेद तिच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फी तिच्या नवीन स्टाईलने दररोज इंटरनेटवर धुमाकूळ घालते. आता उर्फी पुन्हा एकदा धमाल करणार आहे. यंदाचा धडाका हा तिच्या ड्रेसिंग स्टाईलने नाही तर एम टीव्हीवर सुरू होत असलेल्या स्प्लिट्सव्हिला एक्स फोरमुळे होणार आहे. तरुणांमध्ये विशेष चर्चेत असलेल्या या कार्यक्रमात आता उर्फी जावेद दिसणार आहे. या कार्यक्रमाची होस्ट, सनी लिओनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

यासोबतच माहिती दिली आहे की, स्प्लिट्सव्हिला हा शो 12 नोव्हेंबरपासून शनिवार आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता सुरू होत आहे. व्हिडीओमध्ये सनी लिओनीशिवाय अनेक स्पर्धकही दिसत आहेत. त्याचवेळी उर्फी जावेददेखील या शोमध्ये असणार आहे. प्रोमोमध्येही ती दिसत आहे.

स्प्लिट्सव्हिला हा शो 12 नोव्हेंबरपासून एम टीव्हीवर सुरू होणार आहे. ज्यात उर्फी जावेदही दिसून येणार आहे. "मी अनेक वर्षांपासून एम टीव्हीवरील स्प्लिट्सव्हिला शो पाहते आणि फॉललो करतेय या शो चा हिस्सा बनने हे आपले स्वप्न होत जे आता खरं होताना दिसतेय असे उर्फी म्हणाली.

माझा स्वभाव फारच रोमँटिक असल्याने मी या शोसाठी परफेक्ट आहे असं सांगायला उर्फी विसरली नाही. त्यामुळे हा एक कमाल अनुभव असणार आहे, असे ती म्हणाली. माहितीनुसार उर्फी केवळ एक आठ्वड्यासाठीच दिसणार आहे. एक शोसाठी उर्फी जावेद २०-२५ हजार मानधन घेत असल्याचीसुद्धा चर्चा सूरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT