Latest

प. बंगालमध्ये जगातील सर्वात महागडा आंबा

Arun Patil

कोलकाता : पश्चिम बंगालच्या दुबराजपूरमध्ये जगातील सर्वात महागडा आंबा 'मियाजाकी' चे उत्पादन घेण्यात आले आहे. एका स्थानिक मशिदीच्या आवारात लावलेल्या झाडावर हे आंबे लागले. तेथील अधिकार्‍यांनी शुक्रवारी या आंब्यांचा लिलाव केला व त्यामधून लाखो रुपयांची कमाई झाली. या पैशाचा वापर मशिदीच्या विकासासाठी केला जाणार आहे.

सर्वसाधारणपणे जपानमध्ये आढळणार्‍या या आंब्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 2 लाख 70 हजार रुपये प्रतिकिलो असते. एक आंबा दहा ते पंधरा हजार रुपयांना विकला जातो. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दुबराजपूरमधील सैय्यद सोना नावाची एक व्यक्ती दोन वर्षांपूर्वी परदेशात फिरण्यासाठी गेली होती. तेथून त्यांनी मियाजाकीचे एक रोप आणले व ते मशिदीच्या परिसरात लावले.

आता हे रोप मोठे झाड बनले असून त्यावर आठ आंबे लागले. मियाजाकी आंब्याचे वजन सुमारे 350 ग्रॅम असते. एप्रिल ते ऑगस्टपर्यंत या झाडांना आंबे लागतात. पिकण्याच्या सुरुवातीच्या काळात या आंब्यांचा रंग जांभळट असतो. पूर्णपणे पिकल्यावर ते गडद लाल रंगाचे होतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT