Latest

मध्यप्रदेश : महिलेने दिला चार पायाच्या मुलीला जन्म

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील कमलराजा रूग्णालयात एका महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिला आहे. या नवजात अर्भकाला हॉस्पिटलमधील एसएनसीयू विभागात ठेवण्यात आले आहे. या मुलीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिकंदर कंपू येथील आरती कुशवाह या महिलेला प्रसूतीसाठी येथील कमलराजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आरती नावाच्या या महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिला आहे. असा आश्चर्यकारक प्रकार पाहून वैद्यकीय कर्मचारीही हैराण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या नवजात अर्भकाची रूग्णालयाच्या अधीक्षकांसह बालरोग आणि बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने या बाळाची तपासणी केली आहे. जरी या नवजात अर्भकाला चार पाय असले तरी या नवजात मुलीचे सध्याचे वजन हे २.३ ग्रॅम आहे. तसेच तिचे आरोग्य देखील सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लाखात एखादी अशी घटना घडते. बाळाच्या जन्मादरम्यान त्यात शारीरिक विकृती निर्माण होऊन काही गर्भ विकसित होताना एखादे अवयव अतिरिक्त तयार होते. ज्याला वैद्यकीय शास्त्राच्या भाषेत 'इशिओपॅगस' म्हणतात. मुलावर सतत लक्ष ठेवले जाते. त्याचे अतिरिक्त दोन पाय शस्त्रक्रियेद्वारे काढण्याबाबत डॉक्टरांमध्ये चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

या रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. आर.के.एस धाकड सांगतात की, अशा केसेसमध्ये ही जन्मजात विकृती असते. जेव्हा गर्भ आईच्या गर्भाशयात विकसित होत असताना तो एक ते दोन पेशींमध्ये विभागतो, त्यानंतर अनेक वेळा मुले जुळी होतात. या प्रकरणात, असे घडले आहे की खालच्या भागात फक्त पाय विकसित होऊ शकला परंतु शरीराचा वरचा भाग पूर्णता विकसित होऊ शकलेला नाही. अशा स्थितीलाच वैद्यकीय भाषेत 'इशिओपॅगस' म्हणतात.

या बालकाच्या जन्मानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी या मुलीची तपासणी केली आहे. मुलीचे दोन अतिरिक्त पाय शस्त्रक्रिया करून वेगळे करण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी प्रकरणे दुर्मिळ मानली जातात. बालकाला सध्या कमलराजा रुग्णालयातील बालरोग विभागाच्या विशेष नवजात केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT