Latest

Wanindu Hasaranga : आयपीएलमध्ये कोलकाताचे कंबरडे मोडणारा श्रीलंकंन खेळाडू आहे तरी कोण?

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये काल झालेल्या कोलकाता विरूध्द बंगळुरचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात बंगळुरने कोलकातावर ३ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याची. हसरंगाने कोलकाता विरूध्दच्या सामन्यात ४ षटकांमध्ये २० धावा देत ४ फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले. (IPL 22)

वानिंदू हसरंगाने आत्तापर्यंत फक्त चार सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये कमी सहभाग असूनही बंगळुरने मेगा ऑक्शनमध्ये हसरंगावर १०.७५ कोटींची बोली लावली होती. यावेळी सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. याला साजेशी अशी कामगिरी हसरंगाने काल विरोधी टीम कोलकाताचे कंबरडे मोडत केली. हसरंगाने केलेल्या महत्वपूर्ण कामगिरी बंगळुरला यंदाच्या हंगामत विजयाला गवसळी घालता आली. यावेळी कोलकाताचा डाव १८.९ षटकांमध्ये अवघ्या १२८ धावांवर गुंडाळला. (IPL 22 )

सामन्याच्या सुरूवातील बंगळुरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना कोलकातच्या सलामीवीरांना खास कामगिरी करता आली नाही. सामन्याच्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये ४४ धावांत कोलकाताचे तीन गडी बाद झाले. अशावेळी विरोधी संघावर दडपण आले. या वातावरणाचा पुरेपुर फायदा घेत हसरंगा पहिल्या सहा षटकांमध्येच तीन विकेट सहा षटकांत ४४ धावांत पडल्या. (IPL 22)

सामन्याच्या चौथ्या षटकामध्ये हसरंगाने (Wanindu Hasaranga) कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केले. यावेळी फलंदाजांवर दडपण होते. हसरंगाने या वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला. खराब स्थितीत संयमाने खेळण्याऐवजी शॉट मारण्याच्या नादात सुनील नरेनही हसरंगाचा बळी ठरला. पुढच्याच चेंडूवर वानिंदू हसरंगाने यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सनला क्लीन बोल्ड केले. १४,.३ षटकात टीम साऊथीच्या रूपात त्याने चौथा फलंदाज बाद केला.

अफगाणिस्तानच्या स्टार फिरकीपटूशी होते हसरंगाची तुलना

हसरंगाची तुलना अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खानशी केली जाते. एक गोलंदाज जो वेगात लेग स्पिन टाकू शकतो आणि चांगली फलंदाजी देखील करू शकतो. हसरंगाने प्रथम श्रेणी पदार्पणाच्या सामन्यात ८७ धावा केल्या होत्या. हसरंगा श्रीलंकेचा अंडर-१९चा कर्णधारही राहिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर चार कसोटी आणि २९ एकदिवसीय सामने आहेत. याशिवाय ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. त्याने २९ एकदिवसीय विकेट्स आणि टी-२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५७ विकेट घेतल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT